बाब्या आब ग्रॅज्युएट भयोव होतो. नौकरीसाती स्पर्धा परीक्षाको फार्म भरनो अना परीक्षा देनको, असो बाब्या को क्रम चालू होतो. बाब्या लेखी परीक्षात् पास होत होतो पन मुलाखतमा बाब्याला पायजे तसो यश आवत नोहतो. परीक्षा ना परीक्षाच असो बाब्यान् सोची होतीस. असोमा बाब्या दुय्यम सेवा निवड मंडलकी पटवारीकी परीक्षा पास भयोव, बाब्याला मोठी खुशी भयी. मुलाखत नागपूरक प्रशासकीय भवन मा होती. बाब्या साधच कपडामा फाटी स्लीपर पयनकन गयोव होतो. कोणीच वरकीका नोहता. वोला मनमा धकधक लगत होतो. वहानी बाकी टुरुइनकी मस्त बॅग, मस्त जुता देखस्यानी बाब्याला मनमा झुरेव झुरेव लगत होतो. पन आपला दुख आपनच पचावनकी बाब्याला आब् आदत भयी होती.
अंदर कोनला का बिचारीन? का बिचार सिकसेत? यकी तुफान चर्चा बाहेरक टुरु इनमा होत होती पन लाजरो बाब्या कोनलाच काहीच बिचारत नोहतो. आपली खाल घोनकुटी टाकस्यानी मुलाखतक् बाऱ्यामा बिचार करत होतो. वोतमाच दरवाजापरक् चपराशीन् बाब्या को नाव पुकारीस. बाब्या उठेव दरवाजापरक् रजिस्टर मा सही करीस ना "मे आय कम इन सर कयीस" ना अंदर गयेव. सब जनन् बाब्याला बसनला सांगीन. नाव गाव शिक्षण बिचारकन भयेव बादमा प्रश्न पर प्रश्न बिचारत होता. बाब्या पटापट उत्तर देत होतो. बाब्या मनक मनमा बहुत खुश होतो. पन वतरमा एक अधिकारीन नाॅनक्रिमीलीयर सर्टिफिकेट से का? मनुन बिचारीन. बाब्याला नाॅनक्रिमीलीयर सर्टिफिकेट का होसे कहानलका बनसे यव मालुमच नोहतो. मनुन बाब्यान नही कहीस. बाब्याला बसायकन ठेईन ना सब अधिकारी घुनुळघुनुळ करत बोलत होता. मंग वहानक एक अधिकारीन बाब्याला साॅरी कयीस तबच बाब्याला समज गयेव का आपलो निकाल हमेसा वानी लग गयेव. बाब्या निराश मनलका बाहेर आयेव. जीनाकी पायरी उतरकन घर को रस्ता धरीस.
मंग चार पाच दिवस मा भंडारामा पुलीस भरती होती. भंडारा को पुलिस मैदान खचाखच भरेव होतो. बाब्यान यहानबी आपलो नशिब अजमावनकी ठानीस. आपलो ठिकाणा नही लगनको यव बाब्याला मालुम भय गयोव होतो पन कायीबी होय सिकसे मनुन नशिब अजमायकन देखनको बाब्यान ठान लेयीस. बजन बडसे मनुन बाकी टुरु मनमाने केरा खात होता. बाब्यान बी अर्धा डझन केरा सटासट जमाइस. हात पॅंटला पुसीस ना पुलिस मैदानमा दाखल भयेव. बाब्याला वहानी पयचानका दुय संगी बी भेट्या. गर्दी मनमाने होती. सकारक् सात बजेपासून बाब्या मैदान मा उभो होतो. दस बजे पुलिसवाला आया. लाइनमा बाब्या को बिस पचीसवो नंबर रही रहे. बाब्याक मंगा बहुत लाइन होती. मनमाने धक्का बुक्की होत होती. मंगलका मनमाने टुरु ढकलत अना पुळक टुरुइनपरा आदळत होता. पुलिसवालो सिसोली बजायकन थक गयोव होतो. पुलिसवालइनला यतरा टुरु भरतीसाती आयेत मनुन अंदाज नोहतो. हरबोला हर हर महादेव को नारा मैदान मा घुमत होतो. यतमाच टुरुइनन जोरलका मंगलका असो धक्का मारीन का पुळका टुरु पुलिसवालपरच आपट्या. सब पुलिसवाला धावत आया. जो लाइनक बाहेर पडेव वोला उचलकन धरस्यानी पुलिसवाला सप्पाइक मंग ठेवत होता. बाब्याबी धक्का लका लाइनक बाहार पडेव होतो, एक पुलिसवालो सिसोली बजावत धायेव ना बाब्याला ससलो उचलीस ना सबक मंगा मंडाय देयीस. बाब्या बहुत नाराज भयेव पन जरासी पारोनी भयी मनुन जरासो खुश भयेव. मंग पुलिसवालइनन पाच सय झन उचलकन बाब्याक मंगा ठेय देईन. आपल् मंगा बी पाच सय जन देखस्यानी बाब्याला अकीन जराशी खुशी भयी. वन दिवस बाब्याको नशिब अजमायकन देखनसाती नंबरच नही लगेव. बाब्यान चुपचाप घरको रस्ता धरीस.
ठोस लगत लगत बाब्या मैदान मा उतरत गयोव नापास होत गयेव. असो करता करता बाब्यान शिक्षणबी चालू ठेयीस.
चार साल बीत गया. बाब्या आब् बी.एड., एम. ए., एम.एड., भयेव होतो. नागपुरमा बी. एस. एफ. मा एज्युकेशन इंस्पेक्टर की भरती होती. बी. एस्सी., बी.एड. क्वालीफीकेशन पायजे होतो. बाब्या फीट होतो. बाब्या को बजनबी बढेव होतो. बाब्या नागपुरक् झींगाबाई टाकडी क् मैदान मा दाखील भयोव. यहानबी तसीच गर्दी होती. मैदान खचाखच भरेव होतो. मैदानमा सब लाइनमा बस्या होता. यहानको काम बाब्याला सीस्टेमेटीक चोयेव. लाइनमा एक एक पुलिसवालो डॉक्युमेंट चेक करीत होतो. बाब्याको डॉक्युमेंट चेक करनेवालो बहुत साजरो होतो. वु बाकीदुन साजरो होतो. वन् बाब्याला बहुत प्रश्न बिचारीस. सबका डॉक्युमेंट चेक करनक बादमा वु बाब्या जवर आयेव ना आफीसमा आवनला सांगीस. मोठ् सायेबजवर उभो करीस. सायबला बाब्याक् बऱ्यामा पहिलेच इतल्ला भयेव होतो. अधिकारीन् एक पुलिसवालला बाब्याको बजन, साती ना उंची मोजनला सांगीस, वन् बी बाब्या का डॉक्युमेंट देकीस, एन. सी.सी. को सी सर्टीफिकेट बी देखीस, बहुत प्रश्न बिचारीस ना नौकरीकी गॅरंटी देयस्यानी सकारी आवनला सांगीस.
बाब्या बहुतच खुश भयोव होतो. बाब्या का नशिब फडफड्या होता. खुशी क् माऱ्या बाब्या दिवाना भयोव होतो. कोनला सांगु ना कोनला नही अशी बाब्या की गत भयी होती.
****
डॉ. शेखराम परसरामजी येळेकर नागपूर
२/६/२०
मो. ९४२३०५४१६०
No comments:
Post a Comment