Saturday, June 27, 2020

तिथा mahendra patle 003


     "अवो! मरी वो माय, धावो गा बुगी." असी राधाबाई जोर जोरलक रोवन लगी. वोकी या आवाज आयकके राधेश्याम बाबाजी धावतच रांधनखोलीमा आयेव. यहा आयके देख् से त्, राधाबाई तलामलात पडी होती. वोको हातपर दारकी गंजी संडी होती. हात दारलक मखाय गया होता. यव सब अवतार देखके राधेश्याम बाबाजीन् राधा शहानीमायको हातपर थंडो पाणी सोडिस ना वोला कव्हन लगेव, " अवो राधे, जरा चुलोका तिथा त् देख लेतिस साबूत सेत का नही त्." यव आयकेवपर राधाबाई अनखी रोवन लगी. रोवता रोवताच कव्हन लगी "यहा जीनगीको चुलोकाच तिथा येता सुधारेवको बाद भी बिगड गया त्, येन् मातीको चुलोका तिथा काहा तग धरेत." राधाबाई की बात भी खरीच होती. ये बोल आयकके राधेश्याम बाबाजीको भी डोरामा पाणी आय गयेव.
      तीस साल पहिले राधाबाईको लहानसो संसार बहू सुखी होतो. एक ठन टुरी सरिता, ना एक अती लाडको टुरा रमेस. दुय राजा राणीको संसारका वोय दुय सुंदर फुल होता. येन् सुंदर फुलइनला सही तरिकालक परिपक्व करनको काम राधाबाई पुरो इमानदारीलक करत होती. संसार चुलोका दुय नवा तिथा दुय नवा घर बसावनला तैयार भय गया होता. दुहिला राधेश्यामन् चांगलो शिकायी होतीस. सरिता वकील बनी होती त् रमेस डॉक्टर. चुलोको तिथाला जसो रोज सरायके पक्को करसेत तसोच पक्को करनको काम राधाबाई ना राधेश्याम बाबाजीन् करी होतीन. पर का भयेव, उच्च शिक्षण लेनसाठी दुही बहिनभाई मायबापलक अलग  रह्या ना वाहाको वातावरणमा आपली नवी जीवनशैली बनाय लेईन. आता वुनला मायबाप गावठी लगन लग्या होता. उनकी बोलीभाषा, परंपरा, चालीरिती सब उनको नजरमा 'आउटडेटड' भय गया होता. म्हुन कभी सरिता त् कभी रमेस वुनला कव्हत "ओ पापा, व्हाट दिस नानसेंस यौर पोवारी लैंग्वेज ऐण्ड यौर फुलिस रिलेटिव्हज." खरी बात होती उनकी....मुंबईमा शिकेव रमेसला कसी पसंद आये पोवारी बोली ना वोय खेडुत पोवार रिस्तेदार. वोको उठनो बसनो त्, 'हायप्रोफाईल' लोगइनमा होतो. येको साठी राधेश्यामन् बाप म्हुन का करीस, त् काही नही..... सिरीफ राधेश्यामन् वोको दस एकर जमीनमालक चार एकर जमीन बिकके टुरा टुरीको शिक्षण, सरिताको बिह्या ना रमेससाठी नागपूरमा दवाखानो खोल देयी होतीस. 
       सरिता बिह्या करके आपलो घर खुश होती. वोको नवरा विद्याधर चांगलो घरबांधकाम व्यवसायी होतो. पुणेमा वोको धंदा जोरदार चलत होतो. धंदामा अगर बखेडा उभा भया त् विद्याधर पैसा देयके काम सलटाय टाकत होतो. काही समय सरिता भी लढाईमा उतरत होती, ना आपलो कानुनी दावपेचलक समोरको पार्टीकी खटिया खडी कर देत होती. इत् रमेशको हॉस्पिटल नागपूर शहरमा जोरदार प्रसिद्ध होतो. रमेसला आपलो आई, बाबुजीसाठी समय देनो भी मुस्किल भय गयेव होतो. असोमाच वोको हॉस्पिटलमा काम करनेवाली डॉक्टर श्वेता पाटील सोबत वोका सूत जुड्या, ना एक दिवस बात जब बिगड्त चली त् वोन् डॉ. श्वेता संग 'कोर्टमैरिज' कर लेयिस. या बात जब राधेश्यामला पता चली त् उनको बहुत मुंडा खराब भयेव. "पर जातकी टुरी मांगके मोरो संमतीबिना तू शादी करेस त् मोरो घरमा तोला जागा नाहाय." असो कहके वोय वाहालक निकल्या ना सिदो आपलो गाव् बबई आया. वोन् दिवस पासुन उनको ना रमेसको लगाव खतम भय गयेव. इत् विद्याधरको काममा थोडो नुकसान भयेव त् वोन् भी सुसरोकर पैसासाठी तगादा लगायीस. जब् राधेश्यामन् पैसा देनला मना करीस त् वोन् सरिताला पुढ् करके सुसरोपर संपत्तीसाठी 'केस' करीस ना अर्धी जमीन वाहालक लेयके वा बिकिस. वोका जो पैसा आया वोय आपलो धंदामा लगायिस. यव 'केस' लढता लढता राधेश्यामका 'केस' पांढरा भय गया होता. दुही औलादन् वोको चांगलोच उद्धार करी होतीन. रिस्ता नाता भुलके वोय पैसामा चुर भय गया होता. राधेश्याम जब भी राधाबाई संग एकोबारोमा बिचार कर्; तब् वोला जरुर सांग, "राधे चाहे चुलोको तिथाइनला केतो भी सराय पोत कर; वोय एक कालमर्यादाको बाद साथ छोड देसेत, कारन उनकोपर बाहेरको तपन पानीको भी असर जरुर होसे." 
**********************************
✍महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले(ऋतुराज) मु. किडंगीपार पो. ता. आमगाव जि. गोंदिया
भ्र. क्रं. ९५५२२५६१८९
ता. २३/०६/२०२०

No comments:

Post a Comment

कृष्ण अना गोपी

मी बी राधा बन जाऊ बंसी बजय्या, रास रचय्या गोकुलको कन्हैया लाडको नटखट नंदलाल देखो माखनचोर नाव से यको!!१!! मधुर तोरो बंसीकी तान भू...