(सखाराम ना तुकाराम आपसमा बोलसेत)
सखाराम-आता देखो भाऊ कसा कमी खर्च मा बिह्या होसेती.
तुकाराम-बरोबर कहेस भाऊ देखावा होतो .आम्ही काही कमी नाहजन. सब काँपीटेसनमा बिह्या करत.
सखाराम- खरीच कयात ,सामुदायीक बिह्या करो मुहुन समाजका पुढारी सागत होता .पर कोनिकी टोपी कोनिक डोस्कामा आवत नोहोती.
तुकाराम-आता कसा कमी लोक आवसेत कोनीच नाराज नही होत.
सखाराम-मोरी तीन बिह्यामा हालत खराब भय गयी भाऊ .कर्ज बाजारी भय गयो.बिह्या करता करता दुय एकर जमिन चली गयी.आता येंदा कसा लोक बिह्या कमी खर्चमा करसेती .
तुकाराम-समय समयकी बात रव्हसे सखाराम भाऊ.असा दिवस रह्यात सबकिच आर्थिक प्रगती बढे.आता टुरा- टुरी ईंजिनिअर ना डाँक्टर होसेती.
काही दिवसमा कलेक्टर होयती समया बदलतो रव्हसे .समयक संग संग चलो.
सखाराम-होना पुढभी अशीच प्रथा रहेत ठिक से .नहित घाव पलेव ना बैध विसरेव अस़ोच होय.
तुकाराम-मी भी आपलं नातीनको बिह्या असोच कमी खर्चमा करु ना बच्या पैसा जवाईला देय देवू .
सखाराम-खरी कयात आमरं समाजमा सामुहिक बिह्या होय नही सकत, ना लोक बिह्या सामुहिक कर नही सकत. आता हे चांगला दिवस आया सेती.
ना डिजे ना घोड़ा,ना नाचनो कुदनो।
टाईमपर लगिन लगसे,बदलं गयो जमानो।।
तुकाराम-आता असोच योव लाँकडाउन रहे पाहिजे असो मोला लगसे.
सखाराम-हो ना मोलाभी तसोच लगसे .चल मोरंसग आब अकरा बजेको बिह्या से.
तुकाराम- चलो.
(दुई जन जासेती)
वाय सी चौधरी
गोंदिया
No comments:
Post a Comment